"या संग्रहात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकत्र आलेले कवी, कवयित्री आपापल्या लेखनशैलीची विविधता जपण्यात नक्कीच यशस्वी झालेत, असे हा संग्रह वाचताना मला तरी जाणवले. प्रेमातली ओढ असो वा दुराव्यातले प्रेम, संतप्त धरणीला पावसाची वाट असो वा राधेला तिच्या कान्हाच्या प्रेमाची आस, देश प्रेम असो किंवा मग आई वर असलेले प्रेम. 'प्रीत तुझी माझी' या कविता संग्रहात तुम्हाला प्रेमाचे वेगवेगळे भाव बघायला मिळतील. अथक परिश्रमाने, अनेक वादळांना झिडकारत ही नाव सुखरूप प्रवाहित ठेवणारा 'नावाडी' म्हणजे माननीय सचिन किसन कोरडे सर. साहित्याच्या बदलत्या स्वरूपाला गृहीत धरून एक स्वप्न उराशी बाळगून निघालेला हा प्रवासी, त्या शिखरावर पोहोचला! व आता अनेक वाटसरूंना मार्ग दाखवण्याचे काम करत आहे. तसेच त्यांच्यासाठी 'शब्दलेखणी' नावाचेच एक उंच शिखर त्यांनी उभारले आहे."
Prijshistorie
* Prijshistorie bevat geen data van Amazon.
Prijzen voor het laatst bijgewerkt op: